STORYMIRROR

Gangadhar joshi

Romance

3  

Gangadhar joshi

Romance

लावणी

लावणी

1 min
405

राजसा अलाया लै दिसा

ऐसपैस बसा गुलु गुलू हसा

माझ्या शालुचा रंग ओला हिरवा

राया मला तुमच्या बुलेट वरून फिरवा  |ध्रु|


कोरस 

राया हिला तुमच्या बुलेट वरून फिरवा


लै दिसानी आलिया स्वारी

खमंग खावा की शिरापुरी

देते केशरी दूध बी वरी

माझ्या पदरा नी घालते वारा.  1


उन्ह चढल माथ्यवर ती

घ्या येथच जरा विश्रांती

विडा करून देते श्रीमंती

चार इश्का च्या गोष्टी सुनवा.  2


विडा रंगलाय ह्यो प्रेमाचा

माझ्या गुलाबी टच्च ज्वनी चा

वखुत आलाय ह्यो इश्काचा

तुमच्या बुलेट ची गती जरा वाढवा


ह्या गाडीची तऱ्हा लई भारी

हेचा इंजिन पिस्टन हो न्यारी

राजबिंडा दिसती या सवारी

घाट आलाय गाडी वर चढवा


लई दिसतनी खूष ही स्वारी

डबल सीट जावू कोल्हापुरी

रंकाळा वर खावू पाणी पुरी

मला पन्हल्या चा गड दाखवा


नथ घालते मी चाफेकळी

तंग अंगावरती चोळी

अफुवानी इशकाची गोळी

शालू नेसते मी जरतारी हिरवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance