लावणी
लावणी
नखरेल नार मी देखणी
चाल माझी ही मोरणी
नुकतंच सोळावं सरल राया माझ
अहो खाण हिर्याची विचारात तुम्ही कशापाई॥धृ॥
आहो रात्रीची मादक चांदणी
बहरात आली माझी ही ज्वानी
कसा मायाळू राजाच्या गुणांनी
दिला नवा जीवन ग बाई
आता होतील माझे ही विचार धीर धरा काहो घाई
अहो खाण हिर्याची विचारात तुम्ही कशापाई॥धृ॥
आहे दरवळती बाई जुई
आणा तुमच्या हातानं माळा कुंतलं.
नाचे मोर राया रानात तिकडे बाईबाई
साजणा हो आवरा तोल जाई नको हो घाई.
हो खाण हिर्याचीची विचारत तुम्ही कशापाई॥2॥
आहे दरवळती बाई जुई
आणा तुमच्या हातानं माळा कुंतलं.
नाचे मोर राया रानात तिकडे बाईबाई
साजणा हो आवरा तोल जाई नको हो घाई.
हो खाण हिर्याचीची विचारत तुम्ही कशापाई॥2॥
आहो गंधाळती काया माया
आणला मला हातानं माळा हिर्याच.
नाचे जोर राया कानात गुंजते गाणे बाई
साजणा तुम्ही आता काहो माळता गजर् बाई.
हो खाण हिर्याचीची विचारत तुम्ही कशापाई॥३॥

