लाली गुलाबाची
लाली गुलाबाची
*प्रथम पाहून रूप तुझे*
*मन माझे मोहून गेले एवढे*
*सौंदर्य अवर्णनीय तुझे*
*इंद्रधनुष्य फिका पडतो पुढे*
*लाली गुलाबाची झळकते*
*तुझ्या गुलाबी ओठातून*
*सौंदर्य बहरते जणू तुझे*
*देहरूपी दिपस्तंभातून*
*सौंदर्यांची खाण जणू*
*लावण्यवती विश्वसुंदरी तू*
*केशसंभार पाहून वाटते*
*स्वर्गातील मेनकाच तू*
*शोभतो फुलांचा गजरा*
*तुझ्या लांबसडक केसांवर*
*कटाक्षाने घायाळ अन् करते*
*अधिराज्य माझ्या हृदयावर*
*तुझ्या सहवासाने जीवनात*
*झाली माझी स्वप्नपूर्ती*
*तृप्त माझे मन झाले*
*झाल्याने सर्व इच्छापूर्ती*
*भाग्यवान मीच एकमेव*
*कदाचित या भूतलावर*
*स्वप्नसुंदरीच्या प्राप्तीने*
*मन जाहले गहिवर*