लाजणे फार झाले
लाजणे फार झाले


नयनांचे नयनाला, बोलणे फार झाले.
सादेस दे प्रतिसाद, लाजने फार झाले.
भ्रमराचे सुमनाला, अळविणे फार झाले.
कुठवर ही प्रतिक्षा, उमलणे फार झाले.
लटक्या त्या शपथांचे, बहाणे फार झाले.
मन वेडे अस्वस्थ सदा, तडपणे फार झाले.
चंदनासम कांतीचे, प्रलोभणे फार झाले.
आस एक वर्षावाची, जीव जाळणे फार झाले.