शुभं करोती
शुभं करोती

1 min

51
शुभं करोती म्हणूनी,
पणती तेवतो आम्ही
कर जोडोनी तेजपुंजा,
आरोग्य मागतो आम्ही
नऊ वाजता नऊ मिनिटे,
नवाग्रह करतो आम्ही
नवसंकल्प मनाचा करूनी,
नवविपदा हरवतो आम्ही
चराचरात ओतप्रोत तू,
जरी हेच विसरलो आम्ही
हे आशुतोष, दिनदयाळा,
आता तुज शरणागत आम्ही
भटके जरी वाटसरू,
स्वगृही परततो आम्ही
धर्मसंहिता तू सांगितलेली,
पुन्हा आचरतो आम्ही