STORYMIRROR

Rutuja kulkarni

Romance Others

3  

Rutuja kulkarni

Romance Others

कवितेशी भेट व्हावी...

कवितेशी भेट व्हावी...

1 min
229

सांज ढळून गेल्यावर,

आकाशात चांदण्यानी गर्दी करावी.

अशा या अल्लड क्षणी,

कवीची कवितेशी भेट व्हावी..


चांदण्या पाहता पाहता,

रात्रीची धुंदी मनांवर चढावी. 

मगं मनांतील उथळ भावनांनी,

शब्दांची गळाभेटं घ्यावी. 

अशा या बेधुंद वेळी,

कवी ची कवितेशी भेट व्हावी..


कवितेच्या मिठीमध्ये ,

कवीची अख्खी रात्र मोहरून यावी. 

अशांच एकांती रात्री कधी, 

कवीने कवितेची नशा करावी.

आयुष्याच्या अशा अविस्मरणीय क्षणी,

कवीची कवितेशी भेट व्हावी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance