STORYMIRROR

Deodatta Borse

Inspirational

3  

Deodatta Borse

Inspirational

॥ कवितेचे शीर्षक-थेंब थेंब वाचव माणसा ॥

॥ कवितेचे शीर्षक-थेंब थेंब वाचव माणसा ॥

1 min
255

पर्जन्याविना वनसृष्टी नाही

वनसृष्टीविना जीवसृष्टी नाही

सत्य हृदयी हे पचव माणसा

थेंब थेंब वाचव माणसा..थेंब थेंब साठव..!


दुष्काळानं कहर केला

सूर्य तापला..निसर्ग कोपला

काळ्या आईचा उर दुभंगला

निदान हे तरी आठवं माणसा

थेंब थेंब वाचव माणसा..थेंब थेंब साठव..!


कोरडी नदी,कोरडा नाला

विहीरींचाही पान्हा आटला

पाण्याविना बळीराजा खचला

निदान त्याला तरी उठव माणसा

थेंब थेंब वाचव माणसा..थेंब थेंब साठव..!


बोडका डोंगर,माळरान जळाला

हिरवाईचा शालू करपला

अन्नाविना पशू-पक्षी तळमळला

निदान आहेत ते तरी जगव माणसा…

थेंब थेंब वाचव माणसा..थेंब थेंब साठव..!


जलस्रोतांचा तू ऱ्हास केला

वनराईंचा तू नाश केला

पर्यावरणाचा समतोल बिघडला

निदान मनी हे तरी पटव माणसा…

थेंब थेंब वाचव माणसा..थेंब थेंब साठव..!


आता तरी उठ माणसा..अंतरात्मा तुझा जागव

नदी-नाले,विहीर-तळे सारे काही भरव

शेत-बांधा,छत-गल्लींचं पाणी सारे जिरव

शहर-रस्ते,गांव-वस्ती फुल-झाडांनी तू सजव

तूच खरा शिल्पकार माणसा..निसर्ग पुन्हा घडव

थेंब थेंब वाचव माणसा..थेंब-थेंब साठव..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational