STORYMIRROR

Deodatta Borse

Classics

2  

Deodatta Borse

Classics

राघू-मैना

राघू-मैना

1 min
38

आला नाही राघू माझा

वाट पाहू किती वेळ ?

होत आलीय दुपार

कशी सोसू आता कळ ?


नदी वाहत चालली

दर्या राजाला भेटाया

कुठे गेला राजा माझा ?

जीव लागला तुटाया..!


डोळे प्रतिक्षा करूनी

पूर्ण आले भरायला

सांग कधी येशील तू?

अश्रू माझे पुसायला..!


प्रश्न घरी पुसतील

नको ती मिळेल सजा

बोल माझ्या प्रिय साथी

तूला वाटेल का मजा ?


असे कसे रे ! ईश्वरा

प्रेम हे वेड्या मनाचे

प्रितविश्व अंतःरंगी

जसे धरणी-नभाचे..!


लिहू कोणत्या शब्दात

कथा मी राघू मैनाची

दोन काया एक जीव

घट्ट मिठी हृदयाची..!


वृक्ष स्थायिक पाखरं

साथी माझे जीवलग

मूके जीव जाणतात

खरी माझी तगमग..!


राघू ये ना ! लवकर

वेडी मी तुझी रे ! मैना

तुझ्याविना बघ सख्या

कशी झाली माझी दैना..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics