दोन हार्ट
दोन हार्ट
काल बायको बोलली
आय लव्ह यू डियर
आनंदाने मी बोललो
स्पीक डार्लिंग क्लियर..!
सखी लाजूनी म्हटली
स्वीट हार्ट नो मोअर
वय तुझं आहे सख्या
नाऊ फिफ्टी थ्री ईअर..!
आज पुन्हा हट्ट केला
प्लीज अगेन शेअर
गाल धरुनी म्हणे ती
हबी ! यू नॉटी प्लेअर..!
घर संसारी गाडीचे
स्ट्राँग अवर गियर्स
नित्य हर्षाने करतो
पर मोमेंट चियर्स..!
दूध मी अनं साय ती
लव्ह बोथस् प्युअर
बंध या घट्ट नात्याचे
वुई बिलीव्ह शुअर..!
दोन काया एक जीव
स्टील हार्टली निअर
आम्ही अनं दोन हंस
फोर फॅमिली स्कोअर..!

