STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

4  

Meenakshi Kilawat

Romance

कविता

कविता

1 min
353

  

किती गुंतून आहे मी, मना तू आताही माझ्या

किती पात्रे निभावतो, जशी देण्यातही माझ्या...


किती मुक्काम वादाशी , करावे लागता रडले

सदा आशा धरायाची , अशी सपनातही माझ्या...


तुझा वाडा सुना होता, गरज होती केला प्रपंच

दयेचा अर्ज कसा फेटाळला त्रासातही माझ्या...


तजेला मिळतो तेव्हा, सुखाचे होइ मानवही 

 दिवस अन रात्र विचार नव्हता तापातही माझ्या..


 किती राबून चटके सोसले मी ही गरिबीचे

 मला ईश्वरा तुझा रे आसरा शापातही माझ्या.. 


कधीही अंतरी शांती, पहाया लागता कळले 

कधी आलीच नाही ती, घटी वाटेतही माझ्या.....


सुखाला शोधण्यासाठी , पुजा आराधना केली

कलश भरला पहाटेला, अटी भाग्यातही माझ्या...


करी बेचैन मजला सांजवेळी गारवा मजला 

तुझा संदेश येण्याला कधी वाऱ्यातही माझ्या...


©

मीनाक्षी किलावत

8888029763


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance