STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

2  

Meenakshi Kilawat

Romance

कविता

कविता

1 min
392

साजणा माझ्या*


तुझ्यासाठीच अवतरले इथे मी साजणा माझ्या

अखेरी सोडले घरदार माझे साजणा माझ्या।।


किती आत्म्यास जाळू मी कळवळूनी निभावू मी।।

मला विसरून गेले पार माझे साजणा माझ्या।। 


कधी तू जाणता होतो कधी तू संशयी दिसतो

तुला नाही मी कधीही भार माझे साजणा माझ्या।। 


ऋतू आले ऋतू गेले उन्हाळ्याचा उकाडा हा 

तुझ्यातच शोधला आधार माझे साजणा माझ्या।। 


तुझ्याशी गाठ आहेना धरेवर सात जन्माची

पुन्हा सजवून दे आकार माझे साजणा माझ्या।। 


सुने अंगन सुने पंलग सुन्या वाटा सुने ते घर

सदा आतूरता दे तत्पर माझे साजणा माझ्या।।


सदा आहेस तू माझा कसे माहेर आठवते 

तुझे घर दे मला साकार माझे साजना माझ्या।।

©

मीनाक्षी किलावत



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance