STORYMIRROR

Padmakar Bhave

Classics

3  

Padmakar Bhave

Classics

कविता

कविता

1 min
207

जेव्हा काही उरात सलते 

नौका जेव्हा पुरात कलते, 

पापणीत जल दाटून येते, 

तेव्हा तेव्हा आठवणीने ,

धावून ती मज भेटाया येते,


खूप बोलतो मी तिच्याशी

ऐकून घेते माझे सारे

तिलाच कळतात,झोंबतातही

माझ्या आतील गहिरे वारे,

चिंब भिजल्या नेत्रकडा मग

ती पदराने पुसून देते,

खूप बोलते, निशब्दाने

अलगद मजला कुशीत घेते,

कंठ दाटतो अन हुंदक्यांना

जेव्हा आतून येते भरते,

तेव्हा तेव्हा आठवणीने-

धावून ती मज भेटाया येते.


तिलाच कळतो माझा गहिवर

नादही कळतो गाभाऱ्यातील,

गाभाऱ्यातील अंधारी ती-

लावून जाते प्रकाश कंदील.

काही फुले ती ठेवून जाते

नकळत माझ्या ओंजळीतही,

तिलाच जमते,तिलाच कळते

तिलाच सुचते रितभातही.

निघून जाती जिथे सावल्या

आणि केवळ मी पण उरते,

तेव्हा तेव्हा आठवणीने-

धावून ती मज भेटाया येते.


शब्दांचा तो ऐवज घेऊन

कविता मज भेटाया येते.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics