कविता म्हणजे
कविता म्हणजे
कविता म्हणजे नसतं असं मोठं काही दिव्य,
शब्दांची जुळवाजुळव करून केलेलं ते काव्य
कविता म्हणजे एखाद्या विषयाला दिलेली जशी फोडणी,
कविता म्हणजे जिरे मोहरी सारख्या शब्दांची अशी जोडणी
कविता म्हणजे कढीपत्त्यासारखा असा तडका,
कविता म्हणजे फोडणीच्या तेलात उडालेला जसा भडका
कविता म्हणजे झणझणीत तांबड्या रस्स्याचा जणू नाद,
कविता म्हणजे हिंगाचा मिळालेला अभूतपूर्व असा स्वाद
कल्पनेत रमवणाऱ्या अशा जागतिक कविता दिनाच्या,
काव्य प्रेमी तथा लहान थोर कवींना शुभेच्छा आमच्या
