STORYMIRROR

Chaitali Warghat

Tragedy Others

3  

Chaitali Warghat

Tragedy Others

कविता -कुटुंब ( हक्काचं नातं )

कविता -कुटुंब ( हक्काचं नातं )

1 min
204

प्रवास एकट्याचा 

आयुष्याच्या वाटेवरचा

चिंता नव्हती केली

खडतड वाट दिसता


करणार काय होते 

जे राहून गेले

अवहेलना खऱ्याची होता 

ते सोडून सारे दिले 


मांडला होता डाव

हर्षात मन राहिले

दिसता डाव खोटा

मागे वळून ही नाही पाहिले


आपले कोणीही नाही

दुःखाचे डोंगर असता

सुखात सोबतीला

मिळून पार करती रस्ता 


रक्ताची एक नाती

जपून ठेवावं जीव असता 

नसता जन्मदाते

कोणाला मायबाप म्हणता 


हक्काचे एक नाते

हक्काने भांडणारे

पाऊल पडता चुकीचा

खंत शब्दात मांडणारे 


जपून ठेवावं माणसे

आपली असो कि परखे

भेदभाव नसावं कसला 

असावं एक सारखे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy