STORYMIRROR

Arun V Deshpande

Romance

3  

Arun V Deshpande

Romance

कविता- आर्तता मनीची

कविता- आर्तता मनीची

1 min
207

कबूल करून येत नाही

आल्यावर जाण्याची घाई

थांब म्हटले तर तेही नाही

असे येणे मज मंजूर नाही...


ठरले आता बोलणे नाही

बसलो रुसून जरासा पण

दिसलीस तू येतांना इकडे

मग यातले काहीच झाले नाही..


नको विरह असा जीवघेणा

नको प्रतीक्षा व्याकुळतेची

नको दुरावा आपल्यात हा

समजून घे आर्तता मनीची


दिस कलता भेट जाहली

काही शिकायत ना राहिली

शब्द पडले कानी गोड तुझे 

अहा किती छान झुळूक आली..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance