क्षणभर प्रेम
क्षणभर प्रेम
भिर भिर उडत फुलपाखराने
हळूच बोटावर बसावं,
क्षण भरच बसून त्याने
लागलीच दृष्टीआड व्हावं.
पण उडताना बोटावर
मात्र रंग सोडून जावं,
आणि रंगात उडणार
फुलपाखरू दिसावं.
तसंच फक्त क्षणभर च
प्रेमात पडावं,
आणि आयुष्यभरासाठी
त्याच सुंदर क्षणात जगावं.

