STORYMIRROR

Supriya Devkar

Romance

3  

Supriya Devkar

Romance

क्षण एक पुरे प्रेमाचा

क्षण एक पुरे प्रेमाचा

1 min
821

क्षण एक पुरे प्रेमाचा

त्यास कशाला हवी झालर

प्रेमात असावी त्यागाची

ताठ सदैव काॅलर


क्षण एक पुरे प्रेमाचा 

त्यात नसावे हेवेदावे 

ओळखून वेळ साधावी

क्षणांना सादर व्हावे


क्षण एक पुरे प्रेमाचा 

त्यास लालसा नसावी कसली

तिच्या अबोल नजरेतील 

पाहिजे खूण तुम्हाला दिसली


क्षण एक पुरे प्रेमाचा 

त्यात आपुलकीची माया असावी 

भोवताली नसतानासुद्धा 

प्रेमाची छाया दिसावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance