STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

3  

Ashok Shivram Veer

Tragedy

कसं समजावू माझ्या मनाला

कसं समजावू माझ्या मनाला

1 min
162

कसं समजावू माझ्या मनाला,

जगू दे बिनधास्त या दुनियेला

कर्तव्यासाठी झिजविला देह हा सारा,

जनसेवेसाठी झेलला सुख दुःखांचा मारा


नाही पडू दिलं जीवनी कधी पाऊल वाकडं,

साऱ्यांच्या भल्यासाठी घातलं त्यांच्याकडं साकडं

कसं समजावू मी या नयनी,

नको गाळू डोळ्यातून पाणी


होतो कोंडमारा हा किती मनोमनी

येतो दाटूनी हुंदका या हृदयातूनी

कोण समजाविल या भाबड्या मनाला,

नको शिकविण्या जाऊ या वेड्या जगाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy