कशी विसरू
कशी विसरू
तू म्हणतो किती सहज
जा मला विसरून
तुझ्या आठवणीत कशी जगू
सांग सख्या मी दुरून.....
जसा आलास आयुष्यात
प्रियकराचे रूप घेऊन
प्रत्येक क्षण जगत आहे
तुलाच तर मी पाहून.....
तुझ्या सुंदर सहवासाची
करून ठेवली मी साठा
तुझ्या दुराव्याचा सांग ना
कशी सहन करू मी लाटा.....
तुझ्या पासून दूर राहून
मला खरचं जगता येईल का ?
तुझ्या आठवणी क्षणासाठी तरी
माझी पाठ सोडून जाईल का ?....
तुझ्या आठवणीत सख्या
आयुष्यातील किती दिवस काढू
प्रेमाचे घट्ट धरलेले हात
अशी अचानक कशी सोडू.....
तुझे प्रेम,हसणे,रुसने
हक्काने माझ्याशी भांडणे
सोपं आहे का तुझ्या आठवणी
माझ्या -हदयातून काढणे....

