कसे( प्रेम कविता)
कसे( प्रेम कविता)
अधीरतेला आता रोखावे कसे ?
सांग मी कुठवर थांबावे असे ||धृ||
अलगद घेऊ दे, हात तुझा हाती
धडधड कसली अन कसली भिती ...
मला जे होते , तुला होते का तसे ?
सांग मी कुठवर थांबावे असे ||१||
हाती हात घेता, शरमेने तुझे ते लाल होणे
स्मित थोडेसे ओठी, अन खळीचे गाल होणे.
आडोशाचे गीत कोणास , ऐकु जाणार कसे ?
सांग मी कुठवर थांबावे असे ||२||
श्वासांची धावपळ तुझ्या, स्पष्ट ऐकु आली .
बोटांची बोटांशी सलगी खूप झाली ...
ओठांनी ओठांना मग टाळावे कसे
सांग मी कुठवर थांबावे असे ||३||
एक एक बंध, विलग होऊ लागले
आडोशाचे ठिकाण इमानेइतबारे वागले ..
अधीरतेला आता रोखावे कसे
सांग मी कुठवर थांबावे असे ||४|

