Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ajay Chavhan

Romance

3  

Ajay Chavhan

Romance

करू नको घात...

करू नको घात...

1 min
308


करू नको घात...

दे हातात हात माझ्या

करू नको सखे तू घात।

प्रेमामध्ये कशाला गं

आड येते जात-पात?।।


मी खरा प्रियकर तुझा

तुझेही आहे प्रेम मजवरी।

केला का दुरुपयोग तुझा

मी गं सांग ना आजवरी?।

राहशील मजकडे तू

नित्य प्रिये सुखात

प्रेमामध्ये कशाला गं

आड येते जात-पात?।।


प्रभात समयी नित्य नेमाने

स्मरण करतो तुला।

तुझ्यासाठी असेल कधीही

माझ्या हृदयाचा दरवाजा खुला।

सौंदर्याने तुझ्या गं माझ्या

हृदयावरी केली मात।

प्रेमामध्ये कशाला गं

आड येते जात-पात?।।


प्रेम असूनही लपवतेस

सांग अशी तू का करतेस?।

नकार देऊन माझ्या प्रेमाला

माझ्या हृदयाशी खेळतेस।

नक्की सखे काय आहे

सांग तुझ्या मनात?।

प्रेमामध्ये कशाला गं

आड येते जात-पात?।।


Rate this content
Log in