STORYMIRROR

Jyoti Sakpal

Romance

3  

Jyoti Sakpal

Romance

कृष्ण बोलला राधेला

कृष्ण बोलला राधेला

1 min
223

चांदण्यात फिरताना कृष्ण बोलला राधेला 

प्रेम जडले तुझ्यावरी माझ्या प्रिय चांद फुला

गहिवरल्या तिच्या  डोळ्यांनी अश्रूंचा बांध फोडला 

याच क्षणाची वाट बघतली माझ्या प्रिय प्राण फुला

मिलनाच्या या घडीला चंद्र चांदण्या साक्षीला 

कृष्णानेही साज छेडली ओठांना लावत बासरीला 

बावरी राधा त्याच्या मिठीत विरली भान हरपुनी विश्वाचे 

त्याच क्षणाला नाव मिळाले प्रियकरांच्या मिलनाचे  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance