कर्म हाची देव
कर्म हाची देव
करावे सदैव । जीवनी सत्कर्म ।
जाणा तेची मर्म । जीवनाचे ।। 1
जैसे कर्म करी । तसे मिळे फळ ।
जाणा सदाकाळ । जीवनात ।। 2
नको अहंकार । वृथा अभिमान ।
जपा स्वाभिमान । मनोमनी ।। 3
भुकेलेल्या द्यावे । सदा अन्न पाणी ।
हवी गोड वाणी । सदाचिया ।। 4
पहा चराचरी । वसे सदा देव ।
तोची एकमेव । सकळांचा 5
कर्म हाचि देव । सांगे संत वाणी ।
ऐका त्यांची गाणी । सदाकाळ।। 6