STORYMIRROR

Rohini Paradkar

Tragedy

3  

Rohini Paradkar

Tragedy

कपाळकरंटी

कपाळकरंटी

1 min
189

काय ही कपाळकरंटी 

नको तेव्हा डोळ्यासमोर येई

कुंकू पुसले आभाळ कोसळले जग सुने झाले 

सांगा जगावे की मरावे? 


शेजारी पाजारी पाळत ठेवतात 

मिनिटा मिनिटांचा हिशेब ठेवतात 

कशा वाचवू लोकांच्या वाईट नजरा

अजून किती घालू चापून चोपून अंगभर वस्त्र 


घरात नाही कोणाचा आधार 

सासू सासरे दीर नणंदा लोटती दूर

दुःखाच्या ओझ्याने जीव झुरतो 

किती हसावे गोड बोलावे?

 

तरी सगळ्यांच्या गालात लाडू भरावे

सांगा तिने कसे जगावे कसे वागावे? 

कधी संपणार हे दु:खाचे भोग? 

देवा तू तरी बघ कसे जगावे तिने


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy