STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Classics

3  

अमोल धों सुर्यवंशी

Classics

कोसळला उर

कोसळला उर

1 min
538

पालवी न फुटता फळे लागणार.

मुसकी आवळीत की तोंड खुलत म्हणे

इथ प्रत्येक टेन्टर वाऱ्यावर झुलते म्हणे

आश्वासनांचा पोकळ डोंगर रचून

त्या खाली गाडला जातोय जन सागर जणू.


इथे परंपराच आहे गरिब शेतकऱ्यांच्या हाती

नायलॉनची दोरी .

श्रीमंतांच्या पदोपदी सोन्या चांदीची

शेजुरी .


जे पिकतय त्याला भाव नाही.

चांगुलपणाचे राजकारण इथे रोज चाल आहे.

कर्ज माफीसाठी आॅनलाईन फोम भरा.

पोशिंद्यालाच अधार नाही आणि

जिथे तिथे अधार कार्ड लिंक करा.

हातात मावेल एवढही मुठभर मिळत नाही.

घरात खायला अन्नधान्यांचा कण नाही.

बि बियाणे करामध्ये भर होत जाई.


त्याचे पोकळ अस्मितेला डिवचणारे

अडाणी शब्द.

त्याचे आपापसातील असंख्य मतमतांतरे

चेतवणारी पोरखळ भाषणे शिगारेट

धुरा प्रमाणे हवेत विरगळुन जातात.

हेच माहशय स्वतःची चोरी

दुसर्‍याच्या नरडीवर गाडतात.


शेतकऱ्यांच्या भाकरीला लोणी मिळत नाही.

टाळू वरच चाटायला यंत्रणा कमी पडत नाही.

आज.

उदया.

परवा .

निरंतर हेच होणार .

पालवी न फुटता फळे लागणार. ....

उर कोसळेल अंतःकरणानाचा.

नका विसरू हा देश क्रांतीकारकांचा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics