कोरोनामुक्त जनजीवन
कोरोनामुक्त जनजीवन
माहिती नाही,
स्वप्न असेल ?
कि स्वप्नासारखेच काही!
परतलेला भुतकाळ असेल,
कोरोना पुर्वीचा ?
कि त्यासारखेच काही !!
बातमी नसेल T.V वर,
महामारीची!
नसेल सक्ती मास्क आणि
सैनिटाइजर ची!
ना उरेल गरज ,
RTPCR ची!!
भरतील सारे आठवडे बाजार!
शाळेत नियमित घंटानाद!
प्रार्थना स्थळी पुजाप्रहार!
नसेल तेव्हा कोरोना !
नसेल कुठे LOCKDOWN !!
उत्साहात साजर्या होतील ,
जत्रा आणि यात्रा!
जल्लोष असेल ,
सण-सोहळ्यांचा!
नसेल मात्र धोका ,
कोणत्याही Virus चा!!
सारेच शिकतील धडा,
रोगराईच्या भुतकाळातुन!
जपतील आरोग्याला ,
व्यायाम आणि आयुर्वेदाची जोड देऊन!
घेतील सगळेच काळजी,
रोवतील मेढ निरोगी आरोग्याची!!
माहिती नाही ,
कधी येईल ही पहाट नाविन्याची!
वाट पाहीन त्या दिवसाची!!
