STORYMIRROR

Deepali Mathane

Tragedy

3  

Deepali Mathane

Tragedy

कोरोना योध्दा

कोरोना योध्दा

1 min
414

बनूनी जगाचीया ढाल

कोरोनावर करण्या मात

कोरोना योध्दा देई साथ

सेवा देऊनी दिन-रात

    पीपीई किट परिधान

    जीव धोक्यात घालूनी

    स्व-परिवाराची नसे तमा

    जीव देश सेवेस अर्पूनी

कोरोनाचा हा कहर

पसरला माणसा-माणसात

पोलीस दादा काठी घेऊनी

ऊभा अडवण्या रस्त्या-रस्त्यात

   मोदींचे स्वच्छता अभियान मोहीम

    उपयोगी असे सर्वांसाठी

    सफाया करण्या आजारांचा

    रहा उभे एकमेकांसाठी

किती डॉक्टरांनी, पोलिसांनी

जीव अपुला गमावला

अपुल्या देश बांधवांसाठी

कितीतरी घराचा आधार हरवला

     जीव घेऊनी हातावर

    राबती आपल्यासाठी

    सहकार्याची भावना ठेवा

    आपल्या हितकऱ्यांसाठी

मास्क वापरू आपण

वाचवू या देश आपुला 

जीवाच्या पलीकडे काही नसे

जपा एवढाच कुंचला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy