कॉलेजवाली लव्ह स्टोरी
कॉलेजवाली लव्ह स्टोरी


चोरून लपून भेटण्यात
मज्जा होती खरी
आजही वाटते गम्मत
आठवतात जेव्हा गोष्टी
Whatsapp नव्हतं जेव्हा
होते फक्त Messenger
आमच्यासारख्या प्रेमिकांचे
तेच तर होते कबुतर
निवांत फोनवर बोलण्यात
यायची भारीच मज्जा
दिवसभराचा थकवा
क्षणात निघून जायचा
Archiseच्या प्रेमपत्रात
भरभरून लिहायचो कविता
१०० मार्काचा पेपर मात्र
नेहमीच आमचा सुटायचा
कॅन्टीन मध्ये रंगवायचो
सुखद संसाराचे स्वप्ने
किती सुंदर होते ते दिवस
निरागस होते सारे