STORYMIRROR

Mahananda Bagewadi

Inspirational

4  

Mahananda Bagewadi

Inspirational

कोकीळेस श्रद्धांजली

कोकीळेस श्रद्धांजली

1 min
354

धरतीवरचा तारा आज

आकाशात जाऊन बसला

जगातला सुरेख गळा

आज कायमचा बंद झाला


दशकानुदशके सृष्टी

 तृप्त त्या आवाजाने

शब्दनशब्द हरवला

आता भरले अश्रू नयनाने


साधीभोळी लता

तिची कीर्ती मोठी किती

विदेशी केली स्वारी

सोडली न कधी संस्कृती


 जगाला दिलास आज

 शेवटचा तू निरोप

 मृत्यूस तुझ्या आता

 त्या काळावरच आरोप


 संपूर्ण जग आता

 झाला आहे गोळा

श्रद्धांजली वाहतोय तुला

प्रत्येक पोटात गोळा

 

 गाणं सम्राज्ञीने

 गाठला आज स्वर्ग 

 कधीच जाणार नाही

 मनातून तुझे सुकर्म


संपूर्ण भारताला तुझा

 असे किती अभिमान

 पुन्हा नाही जन्मणार

 अशी देशाची आन-बान अन शान....


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Inspirational