कल्पनेतले राजा-राणी...
कल्पनेतले राजा-राणी...
समुद्रतीरावर क्षितिजावरती
निरोप नभीचा घेताना
सूत्र साऱ्या जगाची देतो
शीतल चंद्र किरणांना
त्या प्रेमींनीही तसेच वाळूत
वचन स्वतःला दिधले होते
संसाराची चाके अगदी
तशीच पेलू ठरले होते
काही वर्षांनंतर पुन्हा
निसर्गचक्र तसेच होते
पण कल्पनेतले राजा राणी
वेगवेगळ्या देशी होते
पण कल्पनेतले राजा राणी
वेगवेगळ्या देशी होते...

