STORYMIRROR

Gayatri Sonaje

Romance

4  

Gayatri Sonaje

Romance

कळी

कळी

1 min
486

मनातली कळी

हळूवार खुलली

पाहून तुलाच रे

शरमेनं लाजली...


भ्रमर करुन मनी

विचारपूस केली

जादूची झप्पी

मला देऊन गेली...


हृदय वाचताना

कानात बोलली

हळूवार फुंकर

मारुन बघितली...


छान जमतं रे तुला

वेडं मन वाचायला

डोळ्यात लपलेले

पाणी हे पुसायला...


मनातल्या इच्छा

पूर्ण तर होतात

पण त्या क्षणांची

वाट पाहतात....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance