कलेचा आधार
कलेचा आधार
तुझ्या बासरीचा आवाज
घुमतो दादर स्टेशनवर रोज
जसा कोकिळेचा सुंदर सुर
तसा बासरीचा आवाज मधुर
दिवसभर बासरी वाजवून
रक्त टाकतोस गोठऊन
रसिकांना मंत्रमुग्ध करून
जीवन काढलेस पिंजून
डोळ्यावर जरी काळोख
सजवलास रंगमंच सुरेख
वाजवतोय अशी बासरी रे
तसा खरोखर श्रीकृष्ण रे
गजबजलेल्या गर्दीत
इर्शाद शेख पावा वाजवीत
या कलेच्या बदल्यात
एक दोन रुपया तुझ्या पदरात