कहर पावसाचा
कहर पावसाचा
धुमाकूळ पावसाचा
जीव गेला अनेकांचा,
आले महाप्रलय हे
ऊठे सूर आक्रोशांचा. /१/
कुठे दरड कोसळे
तर कुठे महापूर,
दिसे सावट दुःखाचे
येई रडवेले सूर. /२/
गेले पुरात वाहून
तामझाम संसाराचे,
होते नव्हते संपले
खेळ सारे नशिबाचे. /३/
पावसाच्या तडाख्यात
पशुपक्षी हरपले,
बळी घेतला सर्वांचा
का हे दुष:कृत्य झाले /४/
ताटातूट जीवनांची
शोधे मन स्वकीयांना,
पावसाच्या कहराने
हाक मारे आप्तीयांना. /५/