खिडकी
खिडकी
तुझे गावं जेथे
तेथे मी राहतो
येता जाता
कितीदा तुला
खिडकीतून पाहतो
तू ही कितीदा
मागे वळून बघतेस
एक हलकासा कटाक्ष
खिडकीकडे टाकतेस
वाटायचे मला
एकदा तुला भेटावे
तुझ्या नजरेला
जवळून बघावे
दुरून तुला
पाहण्यात
वेळ असीच
सरून गेली
नजरेशी नजरेची
भेट राहुन गेली
अखेर शेवटी
वरात तुझ्या लग्नाची
दारात माझ्या आली
विरहात तुझ्या खिडकी
मी कायमची बंद केली
गाव बदलले
तुझे नावं बदलले
चेहऱ्यावरचे तुझे
भावं बदलले
कधीतरी केव्हातरी
तू गावात आल्यावर
तू तोचं कटाक्ष टाकायला
जराही चुकतं नाही
पण....
खिडकी तुझ्याकडे
जराही बघतं नाही
