Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Manisha Patwardhan

Inspirational

3  

Manisha Patwardhan

Inspirational

खेळणी

खेळणी

1 min
215


बालपणीची

ताजी आठवण

मनी साठवण

आठवणीची ... १


न ती मिळाली

महाग खेळणी

निसर्गाची कणी

आम्ही ती ल्याली ...२


करमणूक

 वडील करती

खेळणी बनती

ती आपसूक ...३


फणस पान

त्याच्याच पासून

करती फाडून

बैल तो छान ... ४


पाती माडाची ( माड.. नारळाचे झाड )

सुंदर पिपाणी

कोणती ग गाणी

ती गावयाची ... ५


विरी घेऊन

सुपारी झाडाची

कोणी ओढायाची

त्यात बसून ...६


नदीवरती

भाकर्‍या पाडूया

गंमत पाहूया

पाण्यावरती...७


 दांडूनेचही

विटी ही फेकूया

जोरात मारूया

लांबलांबही...८


सागरगोटे

दगड घेतले

नदीच्या मधले

बोलू कां खोटे ?.... ९


 अनोखी अशी

आमुची खेळणी

आनंदाची कणी

कळावी कशी ?....१०


अन्य ते खेळ

सार्‍यांचे असती

जन ते खेळती

घालू या मेळ ... ११


Rate this content
Log in