STORYMIRROR

वैशाली पडवळ 🧚🏻‍♀️( एंजल वैशू )

Romance Tragedy Classics

3  

वैशाली पडवळ 🧚🏻‍♀️( एंजल वैशू )

Romance Tragedy Classics

खेळ भावनांचा ( सुनीत काव्य )

खेळ भावनांचा ( सुनीत काव्य )

1 min
125


खेळत राहिलास सतत, माझ्या भावनांशी

खेळ का केलास ,आयुष्याचा माझ्या??

सांग माझी जागा आहे का , जीवनात तुझ्या??

बोल जरा तू एकांतात ,स्वत:च्याच मनाशी


अनेक स्वप्नं होती आपणं ,एकत्र बघितली

सांग काहीच अर्थ नव्हता का त्यांंना??

समजून घेतलेस का कधी , माझ्या भावनांना ??

तू मला फसवलं ,नेहमीचं पावलोपावली


खेळताना माझ्या भावनांशी ,काहीचं नाही वाटलं तुला??

मलाचं का सोसावी लागली ,त्या दु:खाची पिडा??

कुठल्या चुकीची शिक्षा ,भोगावी लागली मला??

विचार करून करून ,जीव झालाय माझा वेडा..!!


खेळात या प्रेमाच्या, अखेरीस तूच जिंकलास

पण काय मिळवलं तू यातून ? विचार कधी मनास



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance