STORYMIRROR

Sharad Kawathekar

Romance

2  

Sharad Kawathekar

Romance

कधीकधी

कधीकधी

1 min
522

कधी असतोस

कधी नसतोस

कुठंही असतोस

तरीही नसतोस


तरीसुद्धा तू मात्र असतोसच

कधीतरी कुठल्याश्या कारव्यात

नाहीतर त्या मारव्याच्या मळ्यात 


कधी करतोस धुंद 

तर कधीकधी गारव्यात गार गार

कधी ऊन बनून येतोस

एखाद्या तिरपेतून तर

कधी येतोस पाऊस बनून थेंबाथेबातून


कधी येतोस शब्द बनून तर कधी भावना बनून काळजातच घर करून राहतोस

कधी प्रेरणा बनतोस तर कधी साधना

कधी रंग होतोस तर कधी तरंग

या क्षणाला इथं तर त्या क्षणाला तिथं 

तरीसुद्धा तू मात्र असतोसच

कधी इथं तर कधी तिथं 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance