काय सांगू
काय सांगू
भास्कराने पोळलेल्या वावराला काय सांगू
दु:ख माझ्या ढेकळांचे पावसाला काय सांगू
वाळवंटाच्या फुलाचा राग येतो ना तुलाही
रक्त माझे आसवांचे मोगर्याला काय सांगू
धुश्मचक्री चाललेली युद्ध आहे पेटलेले
काजव्यांचा आर्त टाहो भास्कराला काय सांगू
दोन नोटाही मिळेना कामगारांच्या तपाला
मीठ नाही भाकरीला सागराला काय सांगू
काळजाला खोदले मी लावतांना स्वप्न माझे
आसवांचा पावसाळा कातळाला काय सांगू
