काय बोलु तूला
काय बोलु तूला
नवे काय बोलू तुला
सारे काही जुनं आहे
झोका प्रीतीचा अजूनही
तुजविण सुना आहे
आकांक्षेचा दिवा विझूनी गेला
रात्रीचे क्षण सरायचे थांबले
मावळतीच्या आधीच
न सरणाऱ्या क्षणांशी झुरण्याचा
हा क्रम पुन्हा पुन्हा आहे
प्रीतीचा झोका अजूनही
तुजविण सुना आहे

