काव्यमय संवाद..
काव्यमय संवाद..
तो - अगं तुझी पापणी बघ
किंचित ओलसर आहे
रात्रीचा रुसवा बहुतेक
अजून ठाण मांडून आहे..
ती - खरंच काळजी करतोयस
कि नुसता आव आहे
रुसवा तुझ्यावर नाही
माझाच माझ्यावर आहे..
तो - अशी कशी तू सखे
किती भाबडी आहेस
मी स्वप्नी पाहिली
तशीच साजिरी आहेस..
ती - नको लावू लाडीगोडी
तू फार मतलबी आहेस
दिसतोस त्या पेक्षाही
खूप वेगळा आहेस..
तो - माझी बाहुली नेहमी
अशी शंका का घेते
राग गेला कि मग
पुन्हा माझ्याकडेच येते..
ती - मलाही नाही माहित
मी का तुझ्याकडे येते
माझ्या प्रेमाचा ठेवा
का तुझ्याच हाती देते..
तो - याचं कारण एकच
तुझा जीव गुंतलाय माझ्यात
तू कितीही नाही म्हण
हा वेडा रूतलाय तुझ्या काळजात..
ती - खरंच गुंतून गेलेय रे
वेड्या खोलवर तुझ्यात
स्वतःची अशी उरलेच नाहीये
आता मी माझ्यात..
