सुखाची झोळी..
सुखाची झोळी..
1 min
521
घातलेत बांध रोखण्या त्यांना
आलेच अश्रू तर रागवा आता
विसावली पुन्हा जी मिटल्या नयनी
वेड्या त्या स्वप्नांना जागवा आता
खोदली विहीर ही काळजामध्ये
तृष्णेची तृष्णा भागवा आता
उतरले जे दिमाखात कागदावरी
त्या शब्दांना मानाने वागवा आता
पुरे झाले रे हे दुःखाचे सोहळे
सुखाची झोळी कोणी मागवा आता
