STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

3  

Sarita Kaldhone

Inspirational

कात्यायनी

कात्यायनी

1 min
460

दुर्गेचे तव सहावे रूप

सहाव्या दिवशी उपासना

येई शरण जो त्याच्या

पूर्ण करशी मनोकामना...


भगवतीने घ्यावा जन्म स्वगृही

होती इच्छा महर्षी कात्यायनाची

केले त्यास्वव कठोर तप

प्रार्थना केली भगवतीची....


वध करून महिषासुराचा

दुष्टांचा केला संहार

दुर्जनांचा करीत विनाश

अन्यायावर करते प्रहार....


मूर्ती तव चार भूजाधारी

 हाती अभयमुद्रा,वरमुद्रा असे

डाव्या हाती तलवार 

अन कमळ पुष्प हासे.....


भय ,दुःख संतापापासून

मिळे भक्तांना मुक्ती

अर्थ, धर्म, काम, मोक्ष

सोबत राही अचाट शक्ती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational