कामना
कामना
दूर कुठेतरी शांत
निसर्गाच्या कुशीत गाठावा एकांत
मनाला मिळावा थोडासा विसावा,
चिंता दुःखाला तिथे थारा नसावा.
सुंदर स्वप्नातून सूर्याच्या सोबतीने जाग यावी,
सोनेरी किरणांची मखमल अंगभर पसरावी,
नितळ, शीतल जलधारांनी भिजवावे अंग,
सुंदर अनुभूतीने फुलून जावे सर्वांग.
पक्ष्यांची मधुर कुजबुज या कानांनी ऐकावी,
टप टप पडणाऱ्या फुलांनी ओंजळ भरून घ्यावी.
खट्याळ वाऱ्याच्या स्पर्शाने मन बेभान व्हावे,
क्षणोक्षणी किमया करणाऱ्या निसर्गाच्या प्रेमात पडावे.
