STORYMIRROR

Sarika Jinturkar

Tragedy Others

3  

Sarika Jinturkar

Tragedy Others

काळजी

काळजी

1 min
164

 नात्यांची उदाहरण का कधी, 

तराजूने तोलतात 

डोळ्यातल्या इवल्याशा 'काळजी'ने 

ही गणित आपोआप सुटतात  


ह्या इवल्याशा काळजीतच नाती 

खूप काही बोलून जातात

 प्रेमाचे खरे अर्थ तोलुन नाही, 

मायेच्या ओलाव्याने जपले जातात  


मन मोकळ करता, 

करता येत रंगलेला संवाद 

शेवटी "काळजी घे" या

 वाक्यावर येऊन थांबतो  


प्रेम, हुरहुर, संवेदना, काहूर 

आणि ओढ ह्यात मुरलेला हा शब्द 

समोरच्या मनाला अलगद 

स्पर्श करून जातो 

 आणि पुन्हा संवाद संपू नये असा 

मिश्कील अर्थ ही सांगतो  


असेल शब्दात गोडवा, 

वागणूक काळजी, आपलेपणाची

सहानुभूतीची अन् प्रेमाची

 गरज मग कशासाठी?

आपली कोणीतरी करते 

काळजी ही भावना असते 

मनाला अधिक सुखावणारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy