STORYMIRROR

Amol Shinde

Tragedy

4  

Amol Shinde

Tragedy

काळजाच्या तुकड्यांना

काळजाच्या तुकड्यांना

1 min
309

आता मी कोणाचा होऊ कसा

काळजाच्या तुकड्यांना अंतर देऊ कसा


अगं वेडे जगू दे 

मला मनासारखं

तुझ्यामुळेच या

दुनियेने केलं पारखं


दुनियेसमोर भावनांना नेऊ कसा

काळजाच्या तुकड्यांना अंतर देऊ कसा


शब्दांचं जगणं आता

घायाळ झालं आहे

वाईट नसतानाही

मरण जवळ आलं आहे


त्या मरणावर विश्वास ठेऊ कसा

काळजाच्या तुकड्यांना अंतर देऊ कसा


एक कविता प्रेमाची

अपूर्ण राहून गेली

मात्र तुझ्या विरहानं

कविता वाहून नेली


तुझ्या नजरेस कवितेला भिडवू कसा

काळजाच्या तुकड्यांना अंतर देऊ कसा


गळ्याचं ताईत मी

नकळत होऊ पाहिलं

त्या गडबडीत सारं

आयुष्य तुला वाहिलं


पाहून बरबाद आयुष्य जेवू कसा

काळजाच्या तुकड्यांना अंतर देऊ कसा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy