काळी रात्रच सरली नाही
काळी रात्रच सरली नाही
त्या गावाच्या क्षितिजावरती
मी जाऊन आलो तरीही
मज सूर्य गवसला नाही
अन रात्रच सरली नाही
ती रात्र पोर्णिमा नव्हती
ती अमावस्याही नव्हती
त्या धरतीवर कदापि
रविकिरणे आलीच नाही
त्या लिंबू अन मिरच्यांना
रुढी परंपरांची नावे
ते देऊन तिथेच फसले
त्या बंद दारापाशी
मी तरीही थांबून होतो
कुणी येण्याच्या आशेने
काळ्या त्या परंपरांना
कुणी निषेधच केला नाही
मज सूर्य गवसला नाही
काळी रात्रच सरली नाही
