कालचक्र हे फिरते आहे!
कालचक्र हे फिरते आहे!
संकटामागून संकट हे,
अविरतपणे येते आहे!
वाया गेली पहिली पेरणी
पावसा वाट पहाते आहे!!
आलास तो कोपल्याप्रमाणे,
मुसळधार पडते आहे!
दरडी कोसळवून घरा,
गावे उध्वस्त करते आहे!!
वेदना या सभोवताली,
पाहून मन चिरते आहे!
हृदयद्रावक कहाण्यांनी,
क्षणांक्षणांनी मरते आहे!!
भितीला न जुमानता,आले
माणूसकीला भरते आहे!
लाटेवरती स्वार होऊनी,
जीवनगाथा तरते आहे!!
दिवसांमागून दिवस व
वर्ष भितीचे सरते आहे!
युगानियुगे अव्याहत हे,
कालचक्र हे फिरते आहे!!
