काहीतरी राहूनच जात
काहीतरी राहूनच जात
रात्रभर हे वेडं पुस्तक वाचतं,
त्यातील खुप वाक्ये बाजुला नोंदतं,
तु झोपल्यावर तुला एकटाच बोलतं,
दररोज काहीतरी राहूनच जातं.
तुझ्या त्या छायाचित्रांकडे पाहतं,
तुझ्या सौंदर्याचे वर्णन करतं,
तुला चारोळ्या वाचुन दाखवतं,
दररोज काहीतरी राहूनच जातं.
सायंकाळी बागेत तुला शोधतं,
गुलाबाची तुझ्यासोबत तुलना करतं,
जे बोलायचंय ते मनातच ठेवतं,
दररोज काहीतरी राहूनच जातं.
तुझ्या गोड शब्दांची वाट पाहतं,
पोपटासारखे मिठू-मिठू बडबडतं,
घडले-नडले सर्व काही तुला सांगतं,
दररोज काहीतरी राहूनच जातं.
तुला बोलण्यासाठी हे मन रडतं,
कानाकोपऱ्यात तुला ग हुडकतं,
तुझ्यासोबतचे मात्र क्षण आठवतं,
दररोज काहीतरी राहूनच जातं.
भिंतीवर छायाचित्रे गोळा करतं,
तुझ्यासोबतचे क्षण ते रंगवत,
शेवटी तुला मनसोक्त बोलतं,
आणि वर्षानुवर्ष काहीतरी राहूनच जातं.

