का वाटावे असे काही
का वाटावे असे काही
का वाटावे असे काही
तू नजरेआड असताना
तुझाच विचार मनात यावा
तू सामोरे नसताना
का वाटावे असे काही
तू अवखळ हसताना
नजरेने खुणावत मजला
आरामात बसताना
का वाटावे असे काही
तुझ्या बटांना उडताना
केसामधूनी हात फिरवता
अल्लड चाळे करताना
का वाटावे असे काही
तुझे रूप एकवटताना
कटाक्ष नजरेचा धारधार
हृदयात खोलवर झेलताना