का कळले नाही...
का कळले नाही...
खूप काही होते मनात माझ्या,
जे तुला उमगलेच नाही...
डोळ्यातील भाव माझ्या ,
कसे रे तुला दिसलेे नाही...
नकळतच केलेला हाताचा स्पर्श माझा,
तुला कधी जाणवलाच नाही...
खरंच सांग ना!
माझे "तुझ्यावर प्रेम आहे ",
हे तुला कधी कळलेच नाही....
का तू ते कळून दिलेच नाही!

